आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Improve Self Confidence By Celebrity Image Consultant Dr. Prabha Chandra

व्यग्रता वा दैनंदिन जीवनातून छंद जोपासण्यासाठी उसंत घ्याच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा चांगली नोकरी, पैसा असूनही आयुष्यात एकटेपणा येतो. बरेच जण प्रसिद्धी व स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी पछाडलेले असतात. त्यांना स्पर्धात्मक वातावरणात कामासाठी प्रोत्साहन पुष्कळ मिळते, पण एकटेपण त्यांचा पिच्छा पुरवते. एकटेपणातून स्वत:ची सोडवणूक करण्यासाठी काही पथ्ये पाळल्यास आनंद मिळेल.

एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी मित्रांची संख्या वाढवण्यापेक्षा समविचारी मित्रांना जवळ करा. समविचारी मित्र असतील तर तुमच्या आवडीच्या विषयांवर चर्चा व शेअरिंग होईल. बोलताना दबाव वाटणार नाही.
अनेकदा तुम्हाला एकटे राहावेसे वाटते. स्वत:मध्ये मश्गूल राहणे तुम्हाला बरे वाटते. अशा वेळी एकटेपणा जाणवू लागतो. समूहात राहूनही एकटेपण जाईल असे तुम्हाला वाटत नाही. मात्र समूहात व कृतिशील राहिल्याने हळूहळू बरे वाटू लागते. लोकांशी बोलल्याने काही वेळासाठी माणूस एकटेपण विसरतो. जे मित्र तुमच्यापासून दूर राहतात, त्यांना महिन्यातून एकदा अवश्य भेटा. संवादी राहण्याचा प्रयत्न करत राहा.
कुटुंबापासून दूर राहिल्यानेही एकटेपणा वाढत जातो. अनेकांना याची जाणीवच नसते. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुटुंबीयांसोबत, नातलगांसोबत घालवा. मित्रपरिवारासोबत गेट टुगेदर करा. बाहेर फिरून या. कुणाला तुमच्या मदतीची गरज असल्यास नक्की मदत करा. आयुष्याच्या एकटेपणाला सकारात्मक कार्यात परिवर्तित करा.

(लेखिका मानसशास्त्र प्राध्यापक एमआयएमएचएएनएस, बंगळुरू )
myresponse@dbcorp.in