'हे परमेश्वर, माझा मृत्यु वृद्धपकाळाने व्हायला नको. माझे वय वाढले तरी चालेल, परंतु, मृत्यु समयी मी तरुण दिसायला पाहिजे.' हे वाक्य आहे एक प्रसिद्ध डॉक्टरचे.
जीम जॉईन केले आहे. योगा क्लासला जातोय, अशी वाक्ये आपल्या कानावर पडतात. शरीर कमावण्यासाठी आज प्रत्येक जण धडपडत आहे. तरुणाईला तर माचो 'श्वार्जनेगर'सारखा लुक हवा असतो. मात्र, बहुतेक लोक व्यायामात सातत्य ठेवत नाही. परिणामी त्यांना वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागतो. अशा लोकांसाठी एरोबिक एक्सराइज (स्ट्रेथनिंग, स्ट्रेचिंग आणि अँड्युरेंस) करणे योग्य राहील. यासाठी एका आठवड्याचा कार्यक्रम आखावा लागेल.
धावणे...
धावणे हा व्यायाम प्रत्येक वयातील व्यक्तीसाठी आवश्यक आहे. मात्र, वयस्कर व्यक्तीने धावण्यापूर्वी ह्रदयविकार तज्ज्ञ व हाडाच्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. धावताना आपल्या सर्व प्रकारच्या अवयवांचा व्यायाम होत असतो. हाडे मजबूत होतात. तसेच ह्रदयविकार, फुफ्फुसांचे आजार बरे होतात. तसेच रक्ताभिसरणाची क्रीया सुरळीत होते. दररोज एक तास धावल्याने 300 ते 1000 कॅलरीज जळून जातात. वजन कमी होते.
मात्र, चांगल्या रस्त्यावर धावायला पाहिजे. सकाळी धावल्याचा फायदा होतो. शुद्ध हवा मिळते. निसर्गरम्य परिसरात धावायला पाहिजे. शहरात धावल्याने गाड्यांच्या धुरामुळे श्वसनाचे आजार होण्याची शक्यता असते.
धावण्यासाठी समुद्र किनारा, उद्यानात बनवलेले जॉगिंग ट्रॅकचा वापर करावा. मात्र अनेक शहरात सुविधा नसल्यास एखाद्या शाळेचे मैदान धावण्यासाठी निश्चित करावे. जॉगिंगसाठी चांगल्या दर्जाची आणि आरामदायी बूट वापरावे.
सलग 15 मिनिटे धावल्यानंतर श्वसनक्रीया वाढल्यानंतर हळू चालणे योग्य ठरते. श्यसनक्रीया सामान्य झाल्यानंतर पुन्हा 15 मिनिटे धावायला पाहिजे. सुरुवातीला दररोज अर्धा तास धावले पाहिजे. धावण्याच्या गतीचा मुळीच विचार करू नये. अर्धातासांत चार किलोमिटर अंतरावर पोहोचावे. धावल्यानंतर काही मीटर पायी चालावे. स्ट्रेचिंग करावे.
सावधगिरी...
>रात्री जॉगिंग करू नये.
>पहाटे जॉगिंग करताना चकाकणारा टीशर्ट परिधान करावा.
>रस्ता ओलांडतांना चालकाच्या डोळ्यात पाहा. तो तुम्हाला रस्ता ओलांडू देईल.
(वरील छायाचित्र सादरीकरणासाठी वापरले आहे.)