आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय आहे कामसूत्र, या गोष्टी दूर करतील याविषयीचे तुमचे सर्व गैरसमज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामसूत्र... आजही सार्वजनिक ठिकाणी या विषयाची चर्चा करणे तर दूरच याच्या नावाचा उच्चारही काही लोकांच्या डोळ्यांच्या भुवया उंचावतो. काही लोकांच्या दृष्टीने या ग्रंथाची चर्चा करणेसुद्धा अनैतिक मानले जाते. लोकांना एवढेच माहिती आहे की, हा एक यौन ग्रंथ असून यामध्ये केवळ सेक्सची चर्चा करण्यात आली आहे आणि वास्तवामध्ये सेक्स हा भारतीय समाजामध्ये चार भिंतीच्या आत बोलल्या जाणाऱ्या शब्दावलीचा केवळ एक हिस्सा आहे. यावर सार्वजनिक मंचावर चर्चाही केली जात नाही आणि असे करणे योग्यही मानले जात नाही.

अशा परिस्थितीमध्ये कामसूत्रसारख्या महान रचनेवर चर्चा करण्याचा विचारही केला जाऊ शकत नाही. वास्तवामध्ये ज्या लोकांनी कामसूत्र वाचले आहे किंवा याविषयी इतरांपेक्षा जास्त माहिती असेल, त्यांना निश्चितच हे माहिती आहे की कामसूत्र केवळ एक यौन आधारित पुस्तक नाही. हा ग्रंथ जीवनशैलीवर चर्चा करतो. हा ग्रंथ सांगतो की, कामसूत्रमध्ये काम म्हणजे सेक्स तर आहेच, परंतु त्या कामाचा मनुष्याच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो आणि कशाप्रकारे मनुष्य याच्या माध्यमातून आपल्या जीवनाला सकारात्मक दिशा देऊ शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा, कामसूत्रशी संबंधित काही रोचक गोष्टी...