अनेकदा बाजारात कच्चे आणि पिकलेले फणस विकताना दिसतात, परंतु इतर भाज्या आणि फळांच्या तुलनेत फणस विकत घेणारे लोक कमीच असतात. सामान्यतः लोक फणस खाण्याकडे दुर्लक्ष करतात परंतु यामध्ये विविध औषधी गुण आढळून येतात हे फार कमी लोकांना माहिती असावे. ग्रामीण भागात भाजी स्वरुपात खाल्ले जाणारे फणस औषधी गुणांचे भांडार आहे. फणसाचे वनस्पतिक नाव आर्टोकार्पस हेटेरोफायलस आहे.
फणसामध्ये महत्त्वपूर्ण प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स व्यतिरिक्त विविध व्हिटॅमिन्स आढळून येतात.
फणसाशी संबधित आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि काही खास उपायांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर- अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) आपल्याला देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.
फणसाचे खास फायदे आणि उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)