आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण राहाण्यासाठीच्या हार्मोन थेरपीचा जादुई औषधांसोबत धोकाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारावर साइनबोर्ड लावला आहे, ‘लो टी सेंटर’. म्हणजे टेस्टोस्टेरॉन (पुरुष हार्मोन) च्या कमतरतेवर उपाय करणारा दवाखाना. अमेरिकेतील उत्तर टेक्सासच्या संपन्न उपनगर साउथलेकमधील एका आलिशान इमारतीतील दवाखान्यात महिला रिसेप्शनिस्ट रुग्णांचे स्वागत करते. विशाल फ्लॅट टीव्ही स्क्रीनवर ईएसपीएन वाहिनी सुरू आहे. बारमध्ये अनेक प्रकारचे स्नॅक्स आणि पेये ठेवली आहेत. खोलीत फुटबॉल खेळाडूंच्या ऑटोग्राफच्या जर्सी आणि खेळासंबंधी स्मृतिचिन्हे सजली आहेत. मर्दानी व्यक्तिमत्त्वाचे स्वामी माइक सिस्क दवाखान्याचे मालक आहेत; पण ते डॉक्टर नाहीत. ते तर सोन्याचा पाऊस पाडणार्‍या व्यवसायात गुंतले आहेत.

मोठ्या संख्येने वाढत्या वयाचे पुरुष मानतात की, हार्मोन थेरपी त्यांचे सैल पडणारे शरीर उत्साही बनवू शकतात. तसे अमेरिकन अन्न व औषध प्रशासन (एफडीए) याच्याशी सहमत नाहीत. असो. सिस्क अशा पुरुषांसाठी 11 राज्यांमध्ये 49 क्लिनिक चालवत आहेत. त्यांच्या लो टी सेंटरची साखळी 45 हजार रुग्णांवर उपचार करते. प्रत्येक रुग्णांकडून सुमारे 400 डॉलर महिना घेतला जातो. सिस्कचे साम्राज्य दहा कोटी डॉलरचे झाले आहे. म्हातार्‍या होणार्‍या पुरुषांच्या हार्मोन थेरपीच्या व्यवसायात हे केवळ थेंबाइतके आहे. अमेरिकेत 2013 मध्ये 2.4 अब्ज डॉलरची टेस्टोस्टेरॉन औषधांची विक्री झाली आहे. विश्लेषकांना मते 2018 मध्ये हा आकडा 3.8 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

टेस्टोस्टेरॉन थेरपी केवळ त्या वयस्कर पुरुषांसाठी आहे, जे टेस्टोस्टेरॉनची उणीव किंवा अनुपस्थितीच्या स्थितीने प्रभावित आहेत. एफडीएच्या प्रवक्ता अँड्रिया फिशर म्हणतात, पुरुषाचे वय वाढवण्यासह टेस्टोस्टेरॉन निर्माण करण्याची प्रक्रिया मंदावणे स्वाभाविक आहे, परंतु पुरुषाच्या शरीरात पुरेसे टेस्टोस्टेरॉन बनणे बंद झाल्यास ती वेगळी गोष्ट आहे. या स्थितीला हायपोगोनॅडिझम म्हणतात. फिशरने टाइमला सांगितले की, टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होण्याच्या उपचारासाठी कोणत्याही औषधाला मान्यता देण्यात आलेली नाही. तरीही, हजारो डॉक्टर कमी किंवा जवळपास सामान्य टी स्तर असतानाही पुरुषांसाठी धाडकन टेस्टोस्टेरॉन लिहून टाकतात. सिडनी विद्यापीठातील संशोधक डेव्हीड हेंडल्समन यांचे वैद्यकीय पत्रिका ऑस्ट्रेलिायमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार अमेरिकेत 2000 ते 2011 दरम्यान लिहिण्यात आलेले टेस्टोस्टेरॉन प्रिस्क्रिप्शनची संख्या दहा पट वाढली. जगभरात हीच स्थिती आहे. यंदाच्या प्रारंभीच्या अनेक संशोधनातून कळले की, टेस्टोस्टेरॉन घेणार्‍या पुरुषांना हृदयविकाराच्या झटक्यांची शक्यता असते. अमेरिकेत या औषधाच्या हानीसंबंधी वीसेक खटले दाखल झाले आहेत. यानंतर एफडीएने टेस्टोस्टेरॉन बनवणार्‍या कंपन्यांना सांगितले की, त्यांनी लोकांना रक्तवाहिन्यांत रक्त गोठणार्‍या संभाव्य धोक्याबद्दल सांगावे. पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्समध्ये प्रकाशित 55 हजार रुग्ण सर्वेक्षणात टेस्टोस्टेरॉन घेणार्‍यांना हृदयविकाराचा धोका सांगण्यात आला. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये 8000 पेक्षा जास्त रुग्णांच्या अभ्यासातही इशारा देण्यात आला आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीननुसार 2010 मध्ये वृद्ध आणि कमजोर लोकांवर टेस्टोस्टेरॉन थेरपीचा अभ्यास त्यांच्या हृदयावर प्रतिकूल प्रभाव पडण्याच्या शक्यतेला वेळेआधीच नष्ट करण्यात आली होती. कॅनडाच्या आरोग्याधिकार्‍यांनी इशारा दिला आहे की, हृदयविकार, स्ट्रोक, रक्ताची गुठळी होणे, स्पंदने अनियमित होण्याच्या गंभीर धोक्यांमुळे पूर्ण विचारांतीच टेस्टोस्टेरॉन प्रिस्क्राइब केले जावे.

काही संशोधक टेस्टोस्टेरॉन थेरपीचे समर्थन करतात. टेक्सास विद्यापीठाच्या वैद्यकीय शाखेच्या एका पथकाने टेस्टोस्टेरॉन सेवन करणार्‍या 6000 लोकांची तुलना त्या 19000 लोकांशी केली जे टी थेरपीवर नाहीत. अभ्यासानुसार टी थेरपीचे रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका आढळला नाही. दुसरीकडे, काही डॉक्टर्स हेही मानतात की, टेस्टोस्टेरॉनमुळे प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो. काही गाठी फुटू शकतात. धोके असतानाही पुरुषांमध्ये टी औषधांची मागणी वाढतच चालली आहे.
- सोबत, हिलरी हिल्टन

टेस्टोस्टेरॉन कमी होण्याची लक्षणे
पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन कमी झाल्यास अनेक स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्यातील काहींचे संबंध इतर आजार आणि वय वाढण्याच्या सामान्य संकेतांशीदेखील असतात.

ठिसूळ हाडे -
हाडांमध्ये आढळणार्‍या खनिजांच्या कमतरतेमुळे ती ठिसूळ होतात. फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.

मोठे स्तन -
पुरुषांमध्ये मोठे व मऊ स्तन असणे हार्मोन असंतुलनाचे लक्षण आहे.
घटते शुक्राणू -
संतती निर्माण करण्याची पुरुषांची क्षमता नष्ट होते.

केस गळणे -
दाढी, मिशांचे केस कमी वाढतात. काखेतील तसेच शरीरातील इतर ठिकाणचे केस गळू लागतात किंवा पातळ होऊ लागतात.

मांसपेशीतील उणीव
मांसपेशींची ताकद घटण्याने शारीरिक गतिविधींवर परिणाम होतो.
निरुत्साह - यात उत्साह, प्रेरणा, पुढाकार घेण्याची क्षमता, शारीरिक ऊर्जा मंदावते.


धोकेही खूप आहेत
स्लिप अ‍ॅप्निया - टेस्टोस्टेरॉनमुळे झोपेत श्वास घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. अनेक वेळा श्वास बंद होतो, सुरू होतो.

रक्ताची गुठळी - फुप्फुसांत रक्ताची गुठळी होण्याची जोखीम असते.

हृदय व मेंदू - अमेरिकन औषध प्रशासन टेस्टोस्टेरॉन घेणार्‍या पुरुषांत हृदयरोग व ब्रेनस्ट्रोक धोक्यांचा अभ्यास करत आहेत.