मनुष्य हा उभा राहणारा सक्षम प्राणी आहे. त्याच्या चार पायांच्या इतर पूर्वजांच्या तुलनेत तो पुढे सरकण्याचे कारण हेदेखील आहे. तरीही तो बसण्यात जास्त वेळ घालवतो.
आपण जिथे जातो तेथे बसण्याची व्यवस्था असतेच. कार, ऑफिस, घर, डायनिंग टेबल यांसह डॉक्टरांकडे तपासणी करताना देखील आपण बसून घेतो. उघड आहे, हे सर्व आपल्या शरीरासाठी प्रचंड हानिकारक आहे. हालचाल न करून आपण अनेक गंभीर आजारांना िनमंत्रण देत असतो.
तुम्ही रोज व्यायाम करता, तरीही आठ तास बसून राहण्याने घाम गाळण्याचा फायदा राहत नाही, या गोष्टीचे िचंताजनक पुरावे हाती आले आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, व्यायाम महत्त्वाचा आहेच, मात्र जास्त वेळ बसणे चुकीचे आहे. वैज्ञानिक संशोधन सांगते की, आपण कमी बसले पािहजे. खूपच कमी. अमेिरकेच्या अॅरिझोना स्टेट विद्यापीठाच्या मेयो क्लिनिकचे संचालक डॉ. जेम्स लेिव्हने म्हणतात, त्याप्रमाणे उभे राहण्याला अनवट मानले जाते, तसेच बसून राहण्याच्या संबंधात झाले पाहिजे. डॉ. लेव्हिने ट्रेड-मिलने संशोधक आहेत.
निष्क्रिय व हालचाल नसलेल्या जीवनशैलीने आरोग्य ढासळते, हृदयासंबंधी विकार, मधुमेह, स्थूलता आिण उच्च रक्तदाब आदी आजारांचा संबंध बसून राहण्याशी आहे, हे अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले आहे. जास्त बसण्याने शरीराची हालचाल कमी होते. ४३ अभ्यासांच्या विश्लेषणात रोजच्या हालचाली व कर्करोगाच्या प्रमाणाचे विश्लेषण केले गेले. त्यात आढळले की, िदवसा जास्त वेळ बसणाऱ्यांना आतडीच्या कर्करोगाचा २४ टक्के, गर्भाशयाच्या कर्करोगाचा ३२ टक्के, फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका २१ टक्क्यांहून अधिक असतो. ते किती वेळ व्यायाम करतात याचा त्यावर काही फरक पडत नाही. पुरुष व महिलांच्या एका अध्ययनात लक्षात आले की, जे जेवढा वेळ जास्त बसले तेवढाच वेळ व्यायाम करूनसुद्धा त्यांच्या फिटनेसच्या स्तरात घट झाली. दुसऱ्या शब्दांत सांगणे म्हणजे बसून राहण्याने व्यायाम वाया जातो.
तर असे का आहे? मानव शरीर चालण्यासाठी बनलेले आहे. सक्रिय शरीराच्या गरजादेखील असतात. आपण ज्या कॅलरीज घेतो, त्या प्रत्येक पेशी आपले निर्धारित काम करण्यासाठी जळतात. बसण्याने पूर्ण व्यवस्था हळू होते. शारीरिक यंत्रणेची सक्षमता कमी होते. शेवटी पेशी आळशी बनतात आिण निष्क्रिय शरीराला सुस्त बनू देतात.
खुर्चीवर बसून दिवसभर काम करणारे लोक फार फार तर ३०० कॅलरी जाळतात. त्यांच्या तुलनेत बहुतांश उभे आिण चालण्यात वेळ घालवणारा एखाद्या रेस्टॉरंटचा वेटर रोजच्या १३०० जादा कॅलरी खर्च करतो.
लेव्हिने सांगतात, व्यायामाशिवाय सक्रिय राहण्याच्या स्थितीत बदल केला जाऊ शकतो. त्यासाठी व्यवसाय िकंवा नोकरीत बदल करण्याची गरज नाही. त्यांचे म्हणणे आहे, आपल्या नेहमीच्या कार्यशैलीत बदल करून तुम्ही दररोज ५०० ते १००० कॅलरी खर्च करू शकता. खुर्चीवर बसून राहण्याऐवजी आपल्याला पायांचा जास्त उपयोग करण्याची आवश्यकता आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हेदेखील उघड झाले आहे की, जास्त वेळ बसून राहिले असणाऱ्या, परंतु व्यायामाने फिटनेस िमळवणाऱ्या लोकांच्या समूहात स्थूलता आणि जास्त कोलेस्टेरॉल असल्याची अवस्था आढळली नाही.