आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी मिळेल पायांना स्ट्रेंथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा व्यायाम हॅमस्ट्रिंग आणि क्वाड्रिसेप्स म्हणजेच थाइजच्या महत्त्वाच्या स्नायूंवर टारगेट करत डिझाइन केला आहे. यामुळे स्नायू बळकट होतात आणि तुमचे संतुलनही वाढते. पायांचे स्नायू बळकट करण्यासाठी कमी प्रभाव असलेला व्यायाम पुरेसा ठरतो. हा व्यायाम नियमित केल्याने पायांच्या स्ट्रेंथसह तुमच्या शरीराचा स्टॅमिनादेखील वाढेल.

- हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला 6 ते 10 इंच उंच असलेल्या एका बॉक्सची गरज पडेल.
- हा व्यायाम करताना तुम्हाला बॉक्स किंवा स्टेपवर हळूवार जंप करायचे असते. यादरम्यान दोन्ही हात सरळ ठेवत थोडेसे पसरवावे. यामुळे तुम्हाला संतुलन राखण्यास जास्त त्रास होणार नाही.
- तुम्ही हातात डंबेल्सदेखील पकडू शकता.
- असे तुम्हाला सुमारे 15 ते 20 वेळा करावे लागेल. सुरुवातीला आपल्या क्षमतेनुसारही करता येईल. मात्र, सराव झाल्यावर याचे दोन ते तीन सेट नियमित केले पाहिजे.