वजन आणि व्यायामाच्या वेळापत्रकानुसार आहार घेणे चांगले तर असतेच, पण जर तुम्ही रक्तगटाच्या हिशेबाने आहार घ्याल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
डॉक्टरांचा सल्ला गरजेचा
जे लोक आजारी नाहीत, अशांना रक्तगटाच्या हिशेबाने आहार घेणे फायद्याचे आहे. तसेच जर तुम्ही लठ्ठ असाल तर तो कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
ब्लड ग्रुप - ए
वैशिष्ट्य
या रक्तगटामध्ये अॅसिडचे प्रमाण कमी असते. या लोकांनी शाकाहार घेतला पाहिजे. हा रक्तगट थोडा संवेदनशील असतो.
हे खावे : भात, सोया, ओट्स, लसूण, भोपळा, पालक, टोफू, गाजर, नवलकोल, जांभळे, आलुबुखारा, अननस, चेरी, लिंबू, द्राक्षे इत्यादी.
हे टाळा : आंबे, पपई, केळी, नारळ, संत्री इत्यादी फळे. बिअर, लोणचे, अर्क, कोणत्याही प्रकारच्या शेंगभाज्या, मक्याचे तेल, सूर्यफुलाचे तेल, काजू, पिस्ता, मिर्ची इत्यादी.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर ब्लड ग्रुपशी संबंधित आहाराची माहिती....