आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगमुद्रासन केल्याने दूर होतात पोटाचे विविध आजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर एखाद्या व्यक्तीला गॅस,अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, लठ्ठपणाची समस्या असेल तर त्यांनी दररोज योगमुद्रासन करावे.

योगमुद्रासन विधी -
एखाद्या शांत ठिकाणी आसनावर पद्मासन घालून बसा. दोन्ही हातांचे मनगट पाठीच्या मागील बाजूस पडून ठेवा. त्यानंतर डोके हळूहळू उजव्या हाताकडे वळवून गुड्घ्याकडे घेऊन जा. काही काळानंतर पूर्वस्थितीमध्ये या. आता हीच प्रक्रिया डाव्या बाजूच्या गुड्घ्याकडे करा. त्यानंतर डोके सरळ ठेवून स्वतःसमोर जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. थोडावेळ अशाच स्थितीमध्ये राहा. त्यानंतर पुन्हा पूर्वस्थितीमध्ये या.

योगमुद्रासनाचे लाभ -
योगमुद्रासनाचा नियमित अभ्यास केल्यास पोट आणि आतड्यांशी संबंधित आजार दूर होतात. रक्तविकार नाहीसे होतात. हृदय मजबूत होते. पोटावरची चरबी नष्ट होते. मानसिक शक्ती वाढते. शरीर मजबूत होते. गॅस,अॅसिडिटी, बद्धकोष्ठता या आजारांवर हे आसन लाभदायक आहे.