आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parampara Know The Importance Of Number 3 In Hindu Religion

अंक तीनच्या या गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुम्हीही मान्य कराल हा आहे लकी नंबर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाच्या जीवनात अंकाचे विशेष असे महत्व असते. मोबाइल नंबर असो किंवा घराचा, गाडीचा, बँक खात्याच्या अशा अनेक गोष्टींमध्ये अंकाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. प्रत्येकाची अंक निवडीची पद्धत, आवड वेगवेगळी असते. लोक स्वतःच्या शुभ (लकी) अंकाला विशेष महत्व देतात.

बरेच लोक 3 अंकाला अशुभ मानतात, परंतु शास्त्रामध्ये या अंकाचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. पूजा, आरती आणि इतर कर्मकांडामध्ये प्रत्येक काम तीन-तीन वेळेस केले जाते. कारण मनुष्य जीवनाचे तीन केंद्रबिंदू जन्म, जीवन आणि मृत्यू. या तीन अवस्थांचे तीन देवता क्रमशः ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे आहेत. तीन वेळेस आरती घेणे, तीन प्रदक्षिणा घालणे, तीन वेळेस तीर्थ घेणे हे सर्व कार्य या तीन देवतांसाठी केले जातात.

ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही तीन अंकाचे महत्व खूप आहे. सूर्यमालेतील तीन प्रमुख ग्रह आपल्या कुंडलीला सर्वात जास्त प्रभावित करतात. हे तीन ग्रह सूर्य, चंद्र आणि बृहस्पती हे आहेत. सूर्याला पिता आणि आत्मा कारक मानले जाते तर चंद्राला माता आणि मनाचा तसेच बृहस्पतीला ज्ञान आणि आपत्य कारक मानले जाते. यामुळे अनेक ठिकाणी आपण या तीन अंकाला या तिघांचे प्रतिक मानून कर्म करतो.

पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या ३ अंकाशी संबधित काही खास गोष्टी, ज्या हिंदी धर्मामध्ये विशेष महत्वपूर्ण आहेत...