Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Reasons of gaining weight

PHOTOS : जाणून घ्या वजन कमी करण्यातील प्रमुख अडथळे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 15, 2013, 02:01 PM IST

वजन वाढण्याला अनियमित जीवनशैली जबाबदार आहे. म्हणून अनेक आरोग्यतज्ज्ञ आपल्या सवयी सुधारण्याचा सल्ला देतात. असे असले तरी काही आरोग्यविषयक समस्यासुद्धा वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.

 • Reasons of gaining weight

  व्यायाम केल्यानंतर आणि संतुलित आहार घेतल्यानंतरही वजन कमी होत नसल्यास समस्या वेगळी आहे. मूळ समस्येकडे वेळीच लक्ष दिल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येईल.

  वजन वाढण्याला अनियमित जीवनशैली जबाबदार आहे. म्हणून अनेक आरोग्यतज्ज्ञ आपल्या सवयी सुधारण्याचा सल्ला देतात. असे असले तरी काही आरोग्यविषयक समस्यासुद्धा वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणकोणत्या कारणांमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतच जातं...

 • Reasons of gaining weight

  कमी खाण्याची समस्या

   

  जास्त खाल्ल्याने किंवा ओव्हरइटिंगने वजन वाढते असे नाही. कमी आणि अवेळी जेवल्यानेसुद्धा ही समस्या वाढल्याचे पुढे आले आहे. शरीराला जेव्हा उशिरा किंवा कमी आहार मिळतो तेव्हा शरीर स्टार्व्हेशन स्थितीत जाते. या स्थितीत शरीर आपत्कालीन स्थितीत लागणार्‍या कॅलरी साठवण्यास प्राधान्य देते. परिणामी कॅलरी साठत जातात आणि वजन वाढते.

 • Reasons of gaining weight

  शुगर ड्रिंक्स

   

  आपण आहारात मर्यादित कॅलरी घेत असू, पण शुगर ड्रिंक्समुळे शरीरातील कॅलरीचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढते. शीतपेय, चहा, कॉफी, पॅकेज ज्यूस यांच्यामुळे कॅलरीचे प्रमाण वाढते. बिअरसारख्या अल्कोहोलच्या सेवनामुळे पोट वाढण्याची समस्या उद्भवते.

 • Reasons of gaining weight

  पूर्ण झोप न घेणे

   

  तुम्ही नियमित व्यायाम करत असाल, संतुलित आहार घेत आहात; पण पुरेशी झोप घेत नसाल तर वजन वाढते. त्याचप्रमाणे वजन कमी करताना अडथळा येतो. कमी झोपेमुळे चयापचयाची प्रक्रिया मंदावते. परिणामी शरीरातील कॅलरी बर्न होण्याचे प्रमाण कमी होते. अशाने वजन कमी होण्याऐवजी वाढत जाते.

 • Reasons of gaining weight

  आरोग्याची स्थिती

   

  हॉर्मोन्समध्ये गडबड, थायरॉइडसंबंधी समस्या आणि पोलिसिस्टिक ओवरी सिंड्रोमसारखे आजार असल्यास वजन कमी करणे सोपे राहत नाही. अशा आजारात वजन वाढते.
   

Trending