आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटदुखी, अपचन, अ‍ॅसिडिटी या प्रॉब्लेम्सवर प्रभावकारी आहेत हे 8 उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटदुखी, गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी या कॉमन समस्या आहेत. या समस्येंचे मुख्य कारण अन्न व्यवस्थित न पचणे हे आहे. पोट अनेक आजारांचे मूळ आहे. पोट खराब असेल तर शरीर विविध आजारांचे घर बनते. अनियमित दिनचर्या आणि खान-पानामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. तुम्हालाही वारंवार गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर येथे काही घरगुती सोपे उपाय सांगण्यात येत आहेत. या उपायांमुळे तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळेल.

अद्रक - गॅस, अ‍ॅसिडिटीमध्ये अद्रक रामबाण औषधीचे काम करते. थोडेसे वाळलेले अद्रक चहामध्ये टाकून घेतल्यास गॅस, अ‍ॅसिडिटीमध्ये लगेच आराम मिळेल. अद्रकामध्ये अँटीबैक्टिरियल आणि अँटीइंफ्लामेंट्री तत्व आढळून येतात. यामध्ये पोटदुखीची समस्या त्वरित दूर करण्याची क्षमता आहे. अद्रकाच्या सेवनाने गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण करणारे विषाणू नष्ट होतात. वाळलेल्या अद्रकाचा काढा करून पिल्यास गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास दूर होतो.

लवंग - हा एक असा मसाला आहे, जो गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या असणार्‍या लोकांसाठी एक रामबाण औषध आहे. लवंग चंगळल्याने किंवा लवंग मधासोबत खाल्ल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि गॅसची समस्या दूर होते.

पुढे जाणून घ्या, आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)