आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगा आहे विविध आजारांवर रामबाण उपाय; जाणून घ्या, यामधील खास गुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगा (शास्त्रीय नाव: मॉरिंगा ओलेफेरा) भारतातील वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. शेवगा ही खाद्य भाजी आहे. शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते. याची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो.

आयुर्वेदामध्ये 300 रोगांवर शेवग्याने उपचार केले जाऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शेवग्यातील औषधी गुणांची माहिती आणि काही खास उपाय सांगत आहोत...
- शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलॅक्स भरपूर प्रमाणात आढळून येते. शेवग्याच्या पानांची भाजी करतात. लोणच्यात, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी त्याचा वापर करतात.

- पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात. दस्त, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताज रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळेल.

शेवग्याचे इतर काही खास घर्गुरी उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...