आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ऋतूमध्ये दररोज अवश्य खा 1 चिकू, होतील हे खास फायदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिकू गोड, थंड आणि भरपूर औषधी गुणांनी भरलेले चविष्ट फळ आहे. उन्हाळ्यात याचे दररोज सेवन केल्यास आरोग्यदायी लाभ होतात. चिकू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकराचा उत्साह, चैतन्य निर्माण होते. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. चिकूचा रस रक्तात मिसळून उर्जा निर्माण करतो. चिकूची साल ताप नाशक आहे. चिकूच्या सालीमध्ये टॅनिन असते. आतड्यांसाठी चिकूचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. चिकूच्या बियांमध्ये सापोनीन आणि संपोटिनीन नावाचा कडवट घटक असतो.

चिकूमध्ये 71 टक्के पाणी. 1.5 टक्के प्रोटीन आणि 25.5 टक्के कार्बोहायड्रेट असते. यामध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात तर व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते. या फळामध्ये 14 टक्के शर्करा असते तसेच यामध्ये फॉस्फरस आणि लोह असते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
चिकूमध्ये व्हिटॅमिन ई आढळते जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे तुमची त्वचा स्वस्थ आणि सुंदर होईल. चिकूच्या बियांचे तेल केस वाढीसाठी फायदेशीर ठरते.

चिकूचे इतर काही खास फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...