आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य - तुम्हाला रात्री झोप येत नाही; मग असा करा तुमच्या आहारात बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपुर्‍या झोपेमुळे ब-याच लोकाचा स्वभाव चिडचिडा होतो. काही जण या चिडचिडे पणाला कंटाळून झोपेच्या गोळ्या घेणे सुरू करतात, पण एका ठराविक काळानंतर गोळ्याचा शरिरावर परिणाम होणे बद होते. तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर ही पोषक द्रव्ये आपल्या आहारात समाविष्ट करून फायदा मिळवता येईल.

मॅग्निशियम : यामुळे झोप न येण्याच्या समस्येसह उच्च् रक्तदाब आणि डोकेदुखीची समस्याही दूर होते.
यात मिळेल : सीड्स, शेंगभाज्या, गाजर, हिरव्या पालेभाज्या, धान्य, डार्क चॉकलेट, केळी इत्यादी.
पोटॅशियम : यामुळे शरीरात पाण्याचे संतुलन बनते. तसेच रक्तदाब नियंत्रित राहून झोप येण्यास मदत होते.
यात मिळेल : फळे, सुका मेवा, काकडी, टोमॅटो, ओट्स, दही.
व्हिटॅमिन बी-6 : यामुळे तणाव कमी होतो आणि नर्व्हस सिस्टिमही रिलॅक्स होते.
यात मिळेल : काजू, दही, लोणी, बदाम, टोमॅटो, रताळे.
कॅल्शियम : चांगली झोप आणि शरीराला रिलॅक्स करण्यात कॅल्शियम सहायक आहे. याच्या कमतरतेने रक्तदाब अनियंत्रित होण्याची समस्या उद्भवू शकते.
यात मिळेल : हिरव्या पालेभाज्या, दही, बदाम, दूध, ब्रोकोली.
ओमेगा 3 फॅटी अँसिड : यामुळे तणाव कमी होऊन शरीर रिलॅक्स होते आणि झोपही येते.
यात मिळेल : सॉलमन फिश, अंडी, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया.
प्रोटीन : यामुळे कोलेस्ट्रॉल आणि झोपेची समस्या दूर होते. तसेच ब्लड शुगर लेव्हलही संतुलित राहते.
यात मिळेल : अंडी, केळी, नट्स, दही, हिरव्या भाज्या, सीफूड.
लोह : याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे आणि इंसोमेनियाचा त्रास होऊ शकतो.
यात मिळेल : ब्रोकोली, शेंगभाज्या, मटण.