Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | slim body after pregnancy tips

PHOTOS : बाळंतपणानंतर पुन्हा मिळवा कमनीय बांधा

दिव्य मराठी | Update - Feb 06, 2013, 12:00 PM IST

बाळंतपणानंतर कमीत कमी वेळात झटपट वजन कमी करण्यासाठी शॉर्टकटचा वापर कधीच करू नका.

 • slim body after pregnancy tips

  बाळंतपणानंतर कमीत कमी वेळात झटपट वजन कमी करण्यासाठी शॉर्टकटचा वापर कधीच करू नका. कारण हा शॉर्टकट आई आणि बालकासाठी धोकादायक ठरू शकतो. या कालावधीत पोषक आहारासोबत शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम राहणे फार गरजेचे असते. गर्भावस्थेत आणि बाळंतपणानंतर शरीरातील हार्मोन्स बदल झाल्याने वजन वाढणे स्वाभाविक आहे, परंतु याला आटोक्यात आणता येते.

 • slim body after pregnancy tips

  योगा
  हा एक हलका आणि योग्य व्यायाम प्रकार आहे. यामुळे कॅलरी बर्न करण्याबरोबर स्नायूंना बळकटी देण्याचे काम होते. योगामुळे महिलांची प्रकृती हळूहळू सुधारण्याची संधी मिळते. तसेच शरीरावर जास्त ताणदेखील पडत नाही.

 • slim body after pregnancy tips

  पॉवर वॉक
  डिलिव्हरीनंतर काही आठवड्यांनी महिलांनी ठरावीक अंतर चालण्याची सवय लावली पाहिजे. हळूहळू तुम्ही व्यायामाचे प्रमाण वाढवू शकता. ज्या महिलांचे सिझेरियन झाले असेल त्यांनी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर बाहेर फिरण्यास जावे.

 • slim body after pregnancy tips

  या गोष्टीकडे लक्ष द्यावे
  गर्भावस्थेत महिलांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. या काळात जास्त आहार घेतला पाहिजे, असा काहींचा गैरसमज आहे, परंतु हे सत्य नाही. या काळात संतुलित आहार घेणे महत्त्वाचे असते. आहारात पोषक तत्त्वे असावीत. जास्त आहार घेतल्याने नंतर वजन कमी करण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतात.

 • slim body after pregnancy tips

  सूडौल आणि आकर्षक दिसण्याच्या प्रयत्नात कॅलरी प्रमाण कमी होऊ नये. याचा बालकाच्या विकासावर विपरीत परिणाम होतो. या काळात स्तनपान महत्त्वाचे असल्याने आहारात दररोज 400 कॅलरी अतिरिक्त घेतल्या पाहिजेत.

 • slim body after pregnancy tips

  डिलिव्हरीनंतर मी खूप मसाज करून घेतली. शेपमध्ये येण्यासाठी योग्य आहारासोबत पोषक आहार म्हणजे सुका मेवा, दही, सॅलड, सूप, मासे यांना प्राधान्य दिले.
  शिल्पा शेट्टी, अभिनेत्री

Trending