आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र : नऊ दिवसांमध्ये असा कमी होऊ शकतो लठ्ठपणा, लक्षात ठेवा या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार 25 सप्टेंबरपासून देवी दुर्गाच्या आराधनेचा नऊ दिवसीय नवरात्रोत्सव सुरु झाला आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीचे भक्त विविध प्रकारे देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी कणी उपवास करतात, कोणी अनवाणी पायाने फिरतात, कोणी गरबा, जागरण करून देवीची भक्ती करतात. नवरात्रीमध्ये करण्यात येणाऱ्या या परंपरागत उपायांमागे धार्मिक कारणासोबतच आरोग्याशी संबंधित कारणे आहेत. जर तुम्हाला वजन नियंत्रित ठेवण्याची किंवा कमी करण्याची इच्छा असेल तर नवरात्रीतील नऊ दिवस हे काम करण्यासाठी उत्तम आहेत.

- जर एखाद्या व्यक्तीने नवरात्रीमध्ये खाण्यापिण्याच्या संदर्भात पूर्ण संयम पाळला आणि संतुलित आहारासोबत योग्य शरीरिक श्रम केले तर या नऊ दिवसांमध्ये लठ्ठपणाची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. शारीरिक श्रमासाठी तुम्ही दांडिया खेळू शकता. दररोज सकाळी फिरायला जाऊ शकता.

- बटाटा आणि शाबूदाणा खिचडीमध्ये खूप कॅलरी असतात ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. यामुळे नवरात्रीमध्ये तळेलेले पदार्थ, बटाटा, शाबूदाणा हे पदार्थ खाण्याचे टाळावे. आपले पाचन तंत्र शाबूदाणा सहजतने पचवू शकत नाही.

- नवरात्रीचे धार्मिक महत्त्व तर आहेच त्याचबरोबर याचे वैज्ञानिक महत्त्वदेखील आहे.. ऋतू परिवर्तन काळामध्ये उपवास केल्याने आणि व्रताच्या माध्यमातून पवित्र, सकारात्मक भाव विकसित केल्याने व्यक्ती स्वस्थ, निरोगी राहतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, नवरात्रीशी निगडीत वैज्ञानिक आणि आरोग्याशी संबंधित खास गोष्टी..
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)