Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Special use of Lemon for health

PHOTOS : दिसायला दिसते छोटे ... पण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते लिंबू

दिव्य मराठी | Update - Feb 04, 2013, 01:34 PM IST

लिंबाचा रस किंवा लिंबूपाण्याचे नियमितपणे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

 • Special use of Lemon for health

  लिंबाचा रस किंवा लिंबूपाण्याचे नियमितपणे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते, दिवसाची सुरुवात लिंबूपाणी घेऊन करावी. यामुळे त्वचा खुलून दिसते, पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अनेक इतर समस्यांपासून सुटका होते.

 • Special use of Lemon for health

  निरोगी त्वचेसाठी : लिंबू हे त्वचेशी संबंधित समस्या दूर करणारे नैसर्गिक अँटीसेप्टीक औषध आहे. यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात असते. त्वचा तजेलदार ठेवण्यात याची महत्त्वाची भूमिका असते. तसेच वाढत्या वयातील परिणाम रोखण्यातही लिंबू फायदेशीर सिद्ध झाले आहे.

 • Special use of Lemon for health

  पोटाच्या समस्या : पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे मळमळणे, छातीत जळजळ होणे आणि मलावरोध यासारख्या समस्या दूर होतात. तज्ज्ञांच्या मते, यकृतासाठी लिंबू टॉनिकचे काम करतो.

 • Special use of Lemon for health

  दातांसाठी फायदेशीर : दात निरोगी ठेवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे, यामुळे फायदा होतो. तज्ज्ञांच्या मते, दात दुखत असल्यास लिंबाचा रस लावल्याने आराम मिळतो. तसेच लिंबाच्या रसाने हिरड्यांची हलकी मालिश केल्याने हिरड्यातून रक्त निघणे थांबेल.

 • Special use of Lemon for health

  उच्च रक्तदाब नियंत्रित करा : हृदयरोग्यांसाठी लिंबूपाणी रामबाण औषध आहे. यामध्ये भरपूर पोटॅशियम असल्याने उच्च रक्तदाब, मळमळ आणि भीती तसेच मानसिक तणावही दूर होतो.

 • Special use of Lemon for health

  गळ्याचा संसर्ग दूर करावा : गळ्याशी संबंधित समस्या किंवा टॉन्सिल्सची समस्या असल्यास लिंबामुळे खूप फायदा होतो. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्या. यामुळे हमखास फायदा होईल.

 • Special use of Lemon for health

  वजन कमी करा : लिंबूपाण्याचे सेवन केल्याने वजन कमी केले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, त्यासाठी कोमट पाण्यात लिंबाच्या रसासोबत मध मिसळून त्याचे सेवन करावे.

Trending