आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालक भाजीमुळे होतात हे विविध फायदे, असा उपयोग केल्यास मुतखडा दूर होईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालकाला एक गुणकारी पालेभाजी मानली जाते, परंतु केवळ हिमोग्लोबिन वाढवण्याच्या दृष्टीने. फार कमी लोकांना हे माहिती असावे की, पालकामध्ये या व्यतिरिक्त आणखी विविध औषधी गुण आढळून येतात. पालक भाजीचे वनस्पतिक नाव स्पीनेसिया ओलेरेसिया असे आहे.
100 ग्रॅम पालकामध्ये 26 किलो कॅलरी उर्जा, प्रोटीन 2.0टक्के, कार्बोहायड्रेट, 2.9 टक्के, वसा 0.7 टक्के आणि रेशे 0.6 टक्के असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याच गुणांमुळे पालकाच्या भाजीलालाइफ प्रोटेक्टव्ह फूड मानले जाते. आज आम्ही तुम्हाल पालकाचे काही खास उपाय आणि फायदे सांगत आहोत.

- पालकांच्या पानांचा रस आणि नारळाचे पाणी समान मात्रेमध्ये मिसळून सकाळ संध्याकाळ घेतल्यास यामुळे मुतखडा विरघळून बाहेर पडेल.

- कच्छ पालकही खूप गुणकारी आहे. यामुळे पाचन तंत्र व्यवस्थित राहते. खोकला किंवा फुप्फुसामध्ये सुज असल्यास पालकाच्या रसाने गुळण्या केल्यास लाभ होईल.
पालकाच्या औषधी गुणांची आणि परंपरागत ज्ञानाची माहिती देत आहेत डॉ. दीपक आचार्य( डायरेक्टर - अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद). डॉ.आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील आदिवासी भागातील लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित करून त्यांना आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)