आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगराध्यक्ष पदासाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सरस्वती घोणे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. सोमवारी (दि. 22) यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीकडून एकमेव रेविता माणिक बनसोडे यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करणे आहे.

दीड वर्षांपासून सरस्वती घोणे यांच्याकडे नगराध्यक्षपदाची सूत्रे होती. राजकीय करारनाम्यानुसार ही मुदत पूर्ण झाल्यानंतर दिनांक 15 जुलै रोजी घोणे यांनी आपल्या पदाचा जिल्हाधिकार्‍यांकडे राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठी सोमवारी (दि. 22) प्रक्रियेस प्रारंभ झाला. यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रेविता बनसोडे यांचा एकमेव अर्ज दुपारी साहाय्यक पीठासन अधिकारी अजय चारठणकर यांच्याकडे दाखल झाला. दोन वाजेनंतर सदरचा अर्ज चारठणकर यांनी पीठासन अधिकार्‍यांकडे सादर केला. दिनांक 26 जुलै रोजी विशेष सभेत बनसोडे यांची अधिकृत घोषणा होणे बाकी राहिले आहे.

अर्ज दाखल करताना प्रभारी नगराध्यक्ष अमित शिंदे, सुनील काकडे, संपत डोके, रोहित निंबाळकर, अभय इंगळे, पृथ्वीराज चिलवंत, गुलमीर पठाण, वैशालीताई दंडनाईक, सिंधुताई पेठे, शोभाताई देशमुख, मसूद शेख, अँड. जयंत जगदाळे यांची उपस्थिती होती.