आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात स्वच्छतेसोबतच निरोगी शरीरासाठी करा हे आयुर्वेदिक उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा देणार्‍या वर्षा ऋतूचे आगमन झाले आहे. मनाला भुरळ घालणारा पावसाळा संपूर्ण सृष्टीमध्येच कमालीचे चैतन्य निर्माण करतोय. पावसाळा जितका आल्हाददायक, तितकाच अनेक रोग, विकारांना आमंत्रण देणारा असतो. त्यापासून बचाव करण्यासाठी घरच्या घरी करता येणारे अनेक उपाय आहेत. त्यासाठी आहार, विहार व निद्रा या वैयक्तिक बाबींपासून पर्यावरण स्वच्छतेसारख्या सार्वजनिक बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असते.