आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्ट्रेचिंग करून आकर्षक शेप बनवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोट आणि कमरेला आकर्षक बनवण्यासाठी स्ट्रेचिंग केले पाहिजे. काही दिवस नियमित स्ट्रेचिंग केल्यास परिणाम दिसून येतो.
पोट आणि कमरेच्या भोवती जमा होणारी चरबी जळण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे स्नायूंना बळकटी मिळते.

सिंगल लेग स्ट्रेचिंग

  • जमिनीवर आरामात झोपा. आता डावा गुडघा वाकवून डोके आणि खांदा त्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. या वेळी हनुवटीने छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
  • जेव्हा तुम्ही गुडघे छातीजवळ आणता, त्या वेळी श्वास आत घ्या. आता आपला डावा हात पोटरीवर आणि उजवा हात गुडघ्यावर ठेवा.
  • आता उजवा पाय जमिनीवरून 45 अंशांच्या कोनात वर उचला. काही सेकंदांपर्यंत या अवस्थेत राहा. नंतर सामान्य स्थितीत या.
  • हाच प्रकार प्रत्येक पायाने पाच-पाच वेळा करा. शक्य असेल तितका ताण द्यावा. सुरुवातीला थोडे-थोडे व्यायाम करत नंतर व्यायाम वाढवावा.