आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : तापदायक उन्हाळ्यात असे सांभाळा आरोग्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी घराबाहेर पडल्यावर खाण्यासाठी आइस्क्रीम हा एकच मेनू ठरलेला असतो. याचे फॅड दिवसेंदिवस वाढतच आहे. याच्या अमर्याद सेवनाने, सर्दी, खोकला यासारखे विकार होऊन ते पुढे बळावतात. म्हणून उन्हाळ्यामध्ये भरपूर आइस्क्रीम खाण्याचे हे फॅड कमी करून शरीराला उपकारक ठरतील अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक झाले आहे. आपण अशा पदार्थांची खाद्य ओळख याठिकाणी करून घेऊ या. उन्हाळ्यामध्ये उन्हाचा त्रास सुसह्य होण्यासाठी काही नैसर्गिक खाद्य पदार्थांचा उपयोग आपल्या खाण्यामध्ये करणे गरजेचे आहे. त्यासाठी हे पदार्थ कोणते याची माहिती करून घेणे अगत्याचे आहे.