आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यातील आजारांपासून दूर ठेवतील हे पेय, शरीराला मिळेल थंडावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात पोटाचे तसेच विविध आजार कोणालाही आपल्या विळख्यात घेऊ शकतात. उष्णता दिवसेंदिवस वाढत असून लोकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवत आहे आणि यामागचे कारण शरीरातील पाणी कमी होणे हे आहे. घसा कोरडा पडणे, मळमळ होणे, डायरिया, अपचन, खूप घाम, थकवा येणे इ. समस्या उन्हाळ्यात होणे सामान्य गोष्ट आहे. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती ठाण पेयांबद्दल सांगत आहोत.

जलजीरा -
उन्हाळा सुरु होताच उत्तर भारतात ठिकठिकाणी जलजीरा विकणारे लोक दिसतात. हे पेय उत्तर भारतात खूप प्रचलित आहे. यामध्ये जिरे, काळे मीठ, पुदिना आणि पाणी यांचे एकत्रित मिश्रण असते. जलजीरा पावडरही बाजारात सहज उपलब्ध होते. जलजीरा पिल्याने पोटाशी संबधित आजार लवकर बरे होतात.

पुढे जाणून घ्या, इतर खास पेयांची माहिती...