आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुमेहाची चाहूल अशी ओळखा, ही आहेत लक्षणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
31 कोटी मधुमेह रुग्ण आहेत भारतात, जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार. दरवर्षी यात मोठी वाढ होत आहे.
काही लक्षणांकडे लक्ष दिल्यास आपल्याला कळेल की मधुमेह आपल्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. मधुमेह होण्यापूर्वी शरीर आपल्याला असे काही संकेत देतो, ते वेळीच ओळखून आपण मधुमेहाचा सामना करण्यासाठी सज्ज होऊ शकतो.
1. जास्त तहान लागणे : जास्त प्रमाणात किंवा वारंवार तहान लागणे मधुमेहाचे लक्षण असते. मधुमेह झाल्यावर व्यक्तीचे मूत्रपिंड जास्तीत जास्त ग्लुकोज तयार करते. अशाने व्यक्तीच्या शरीरात पाणी कमी होण्यासोबत व्यक्तीला तहान लागते. म्हणून जर जास्त प्रमाणात आणि वारंवार तहान लागत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
2. वजन कमी होणे : तीन ते चार महिन्यांच्या काळात अडीच ते तीन किलो वजन कमी होणे मधुमेहाच्या शक्यतेकडे इशारा करते. असे होण्यामागचे कारण म्हणजे आपले शरीर पुरेशा प्रमाणात ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचवू शकत नाही. परिणामी, वेगाने वजन कमी होऊ लागते.