आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा शौक देतो गंभीर आजाराला निमंत्रण, शाहरुखही याबाबतीत राहतो सजग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामामुळे असो की सवयीमुळे पण जवळपास 90 टक्के लोक चूकीच्या जीवनशैलीचे अनुकरण करत असतात. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

अयोग्य जीवनशैलीमुळे झोप न येणे, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबासारखे आजार होणे सामान्य बाब झाली आहे, पण लाइफस्टाइलशी निगडित या आजारांचे स्वत:चे असे काही दुष्परिणाम असतात.

मानसिक संतुलन बिघडते
हृदयरोगाने पीडित असलेल्या या आजाराचा परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर पडू शकतो. म्हणजे भाषा समजणे, विचार करणे आणि निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. अशा पद्धतीचे आजार प्रामुख्याने महिला हृदयरोगींमध्ये जास्त प्रमाणात दिसते. ही बाब अमेरिकेत झालेल्या संशोधनात पुढे आली आहे. यात व्यक्तीचा स्मृतिभ्रंश होत नाही, पण ती विसरण्याच्या आजाराचा बळी ठरतो. संशोधकानुसार अशा आजारांचा वेळीच अंदाज न आल्यास व्यक्तीच्या स्मरणशक्तीची मोठ्या प्रमाणात हानी होते.