आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहा-कॉफीची आवड आहे, मग हे नक्कीच वाचलं पाहिजे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जास्‍तीत जास्‍त लोकांना चहा आणि कॉफी आवडते, तर काही लोकांना फक्‍त चहा किंवा कॉफी यापैकी एकच पेय आवडते. ब-याच लोकांना चहा पिण्‍यासाठी निमित्त लागत नाही, वाटेल तेव्‍हा ते चहा पितात. चहा हे सर्वांनाच आवडणारे पेय म्‍हणून ओळखले जाते. चहा बरोबरच कॉफी पिणा-या लोकांची संख्‍या कमी नाही. सध्‍या लोकसभा निवडणूकीच्‍या धुमाळीत 'चाय पे चर्चा' होऊ लागली आहे. चहा हे व्‍यसन आहे की सवय हा वादाचा विषय असला तरी चहा मात्र सर्वाना आवडतो.
आज आम्‍ही तुम्‍हाला चहा आणि कॉफी संदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहोत
चहा आणि कॉफीमध्‍ये कॉफीनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. कॉफीन जास्‍त प्रमाणात घेतले तर शरीरासाठी हानीकारक ठरते. मात्र शरीराला कॉफीनची गरज असते. कॉलोन विद्यापीठाच्‍या फार्मासिस्‍ट कुनो गुटलरच्‍या मते कॅफीनमुळे हृदयाचे ठोके वाढतात. हृदयाचे ठोके वाढले तर मेंदूमध्‍ये रक्‍तपुरवठा सुरळीत होतो व मेंदूला मुबलक प्रमाणात ऑक्‍सीजन मिळतो.
चहा-
चहाचे विविध प्रकार आहेत. ग्रीन टी, बॅल्‍क टी, लिबांचा चहा शरीरासाठी फायदेशीर ठरतो. ग्रीन टी घेतल्‍यामुळे कॉन्‍सर होण्‍याची भिती राहत नाही. ग्रीन टी नेहमी घेतल्‍यानंतर वजन वाढत नाही. मात्र चहाचे प्रमान योग्‍य असायला हवे. जास्‍त चहा प्‍यायल्‍यानंतर त्‍याचा परिणाम शरीरावर होतो. जर प्रमाणापेक्षा जास्‍त चहा प्‍यायल्‍यानंतर पोटात गॅस तयार होतो. दिवस भरामध्‍ये जास्तित जास्‍त 5 ते 6 चहा प्‍यायला हवेत.
कॉफी-
कॉफी आरोग्‍यासाठी उपायकारक आहे. मात्र कॉफी पिण्‍याचे प्रमाण योग्‍य असायला हवे. कॉफीचे प्रमाण्‍ा वाढले तर निद्रानाश होऊ शकतो. रोज तिन-चार पेक्षा जास्‍त कप कॉफी प्‍यायलानंतर त्‍याचा वाईट परिणाम शरिरावर होतो.
अधिक माहितीसाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...