आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : हाताच्या या मुद्रा, या आजारांवर करतात औषधीचे काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग आणि प्राणायाम केल्याने कोणताही असाध्य आजार ठीक होऊ शकतो असे मानले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का योग मुद्रासुद्धा तेवढ्याच प्रभावी असतात. हाताने तयार केल्या गेलेल्या या मुद्रा जास्त कष्ट न करता तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यास सक्षम आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास योग मुद्रांची माहिती देत आहोत.

ज्ञान मुद्रा - एखाद्या शांत आणि शुद्ध वातावरणामध्ये आसन टाकून त्यावर पद्मासन किंवा सुखासनात बसा. त्यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. त्यानंतर अंगठ्याजवळील बोट तर्जनी (इंडेक्स फिंगर) वाकवून त्याच्या टोकाला अंगठ्याचा टोकाचा स्पर्श करावा. बाकीचे तिन्ही बोटे सरळ ठेवावीत. अंगठा आणि तर्जनी बोट मिळवल्याने जी मुद्रा तयार होते तिला ज्ञान मुद्रा म्हणतात.

लाभ - मानसिक रोग म्हणजे अनिद्रा किंवा जास्त झोप, कमकुवत स्मरणशक्ती, रागीट स्वभाव यामध्ये ही मुद्रा फायदेशीर ठरते.
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)