आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा असे जाणवते की पूर्वीप्रमाणे त्वचा चमकत नाही. तजेलाच निघून जातो. याची विविध कारणे असतात. या बाबींकडे लक्ष दिल्यास गेलेली चमक परत मिळू शकते.

एक्सफोलिएट : यासाठी स्क्रबचा वापर करा. शिवाय फेसाळणाऱ्या फेसवॉशचा वापरही करा. यात एक्सफोलिएट बीड््स असावेत. घरात साखर आणि मधानेही स्क्रब तयार करू शकता. एक्सफोलिएशनमुळे मृत त्वचापेशी गळून जातात. त्यामुळे त्वचा रंध्रे खुली होतात.

मॉइश्चरायझिंग : सुरकुत्या आणि व्रण कमी करण्यासाठी त्वचेला चांगले मॉइश्चरायझिंग करून घ्या.

अँटी-ऑक्सिडंट खा : दररोज जीवनसत्त्व असणारे पदार्थ घ्या. आवळा, संत्री, लिंबू यांचे सेवन नित्याने करा.

सनस्क्रीनचा वापर : रोजएसपीएफ-३० युक्त सनस्क्रीनचा वापर करा. त्यामुळे त्वचेवरील डाग कमी होतील. असमान रंगछटा जातील.

स्किन ब्रायटनिंग फेसवॉशचा वापर करू शकता. विशेषत: असमान त्वचाछटांवर हे काम करते. महिन्यातून एकदा फेशियल करा.