आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवेळी केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी करा हे उपाय, गेलेले केस पुन्हा येतील...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमी वयात केस गळणे हे सर्वांसाठी तनाव आणि चिंतेचे कारण असते. केस गळण्याची समस्या जर अनुवांशिक असेल तर त्याला एंड्रोजेनिक एलोसेसिया म्हटले जाते. अशा वेळी केस गळण्याची समस्या ही किशोरावस्थेपासुनच असु शकते. तर महिलांमध्ये ही समस्या 30 वर्षांनंतर निर्माण होते. याव्यतिरिक्त खाणे-पिणे, पर्यावरण प्रदुषण आणि औषधींच्या रिअॅक्शन किंवा अशा अनेक कारणांमुळे टक्कल पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्हालाही अशीच समस्या असेल तर ही समस्या दूर करण्याचे काही घरगुती उपाय आज आम्ही सांगणार आहोत.

1. जटामांसीला खोब-याच्या तेलात उकळुन घ्या. हे तेल थंड करुन एखाद्या बॉटलमध्ये भरा. रोज रात्री झोपण्याअगोदर या तेलाने मालिश करा. केसांचे अवेळी गळणे आणि पांढरे होणे दूर होईल.

2. मीठाचे अधिक सेवन केल्यानेही टक्कलपणा येतो. मीठ आणि मीरे पावडर एक-एक चमचा आणि पाच चमचे खोब-याचे तेल मिक्स करा. हे टक्कल असलेल्या ठिकाणी लावा. असे केल्याने केस पुन्हा येतील.

3. कोमट ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी पावडर टाकुन पेस्ट बनवा. अंघोळी अगोदर ही पेस्ट डोक्यावर लावा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या. काही दिवसांनंतर केस गळण्याची समस्या दूर होईल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... अजुन कोणत्या घरगुती उपायांनी केस गळतीची समस्या दूर करता येते...