आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात दररोज जास्त पाणी कसे प्याल, वाचा 10 सहजसोपे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाणी शरीरासाठी अनिवार्य पोषक तत्व आहे. आपल्या शरीराचा 70 टक्के भाग पाण्याने व्यापेलेला असतो. अन्नाशिवाय तुम्ही काही दिवस जगू शकता परंतु पाण्याशिवाय नाही. शरीराच्या निर्माण आणि पोषणामध्ये पाण्याच्या अति महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे पर्याप्त प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. पर्याप्त प्रमाणात पाणी पिण्याचा विषय निघाल्यानंतर हे म्हणणे सोपे आहे की, होऊन जाईल. परंतु दिवसातून कमीत कमी दोन लिटर पाणी पिणे आपल्यासाठी थोडे अवघड ठरू शकते. यासाठी आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात सहजसोप्या पद्धतीने दिवसभरात जास्त पाणी कसे पिता येईल याचे उपाय सांगत आहोत.

एक लक्ष्य निर्धारित करा
नियमितपणे पर्याप्त पाणी पिण्याची सुरुवात करण्यापूर्वी, तुम्हाला या गोष्टीवर विचार करावा लागेल की पूर्वी तुम्ही किती पाणी पीत होतात आणि आता तुम्हाला दिवसाला किती जास्त पाणी पिण्याची आवश्यकता आहे.
बॉटलवर मार्किंग करा
दिवसभर स्वतःला पाणी पिण्यासाठी गतिमान ठेवण्यासाठी पाण्याचा स्तर आणि वेळेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी पाण्याच्या बॉटलवर मार्किंग करा. एक स्थायी मार्कर घेऊन बॉटलवर सेक्शन रुपात मार्किंग करून वेळ लिहा. उदा. पहिल्या सेक्शनमध्ये 11 वाजेपर्यंत आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये 2 वाजेपर्यंत किती पाणी पिणे आवश्यक आहे.
जास्त प्रमाणात पाणी पिण्याचे इतर काही खास उपाय आणि पाणी पिण्याची चांगली व वाईट वेळ कोणती... जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...