आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागरण, प्रवास, तापामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी करून पाहा हे घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवसातून 2 वेळा कडाडून भूक लागणे, सकाळी एकदाच पोट साफ होणे. रात्रीची झोप व्यवस्थित लागणे, दिवसभर काम करण्याचा उत्साह असणे हे एका स्वस्थ व्यक्तीचे लक्षण आहे. यात बिघाड झाला की आजार होतात. पुष्कळ वेळा अनेक कारणांनी थकवा येतो, तर चुकीच्या जीवनशैलीमुळे थकवा वाढत जाऊन आजार होतात.
भूक न लागणे, अंग मोडून येणे, डोके दुखणे, डोळ्यासमोर ग्लानी येणे, चक्कर येणे. रात्री झोपेत पोट-या दुखणे, बसून राहावेसे वाटणे, कुणाशी बोलू नये असे वाटणे, डोळे मिटून पडून राहणे, चालताना दम लागणे इ. शरीरास थकवा असताना लक्षणे दिसतात. कारणानुसार व आजारानुसार येणा-या थकव्यासाठी आयुर्वेदात सांगण्यात आलेले काही खास उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
उपाय
1) तापातून शरीरात थकवा असेल तर त्यावर दूध उत्तम आहे. तसेच सुंठ, खारीक, मनुका, साखर तूप घालून तापवून थंड करून मध घालून दूध घेतले असता तापामुळे आलेला थकवा निघून जातो. हे उपचार ताप उतरल्यावरच करावे. ताप असताना दूध पिऊ नये.
इतर खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)