आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या स्त्रिला होणार्‍या या सामान्य समस्यांना आजार समजू नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
45 ते 50 या वयोगटादरम्यान महिलांना रजोनिवृत्तीमधून जावे लागते. तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीत होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे शरीराच्या गरजाही बदलतात. त्यामुळे आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते. रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी थांबणे. वयाच्या 12 व्या वर्षापासून सुरू झालेल्या मासिक पाळीचा बंद होण्याचा कालखंड म्हणजे रजोनिवृत्ती होय.

इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनमुळे रजोनिवृत्तीच्या काळात विविध व्याधी आणि तक्रारी जाणवतात. येथे जाणून घ्या, रजोनिवृत्तीमुळे निर्माण होणार्‍या सामान्य समस्यांबद्दल..

शारीरिक समस्या -
रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात महत्त्वाचे बदल जाणवतात. मासिक पाळीत अनियमितता येणे, हाडांची दुखणी उद्भवणे, लठ्ठपणा जाणवतो, चरबी ही कंबरेकडील भागात जास्त जमा झालेली दिसते. नैराश्य, मानसिक कुचंबणा, चिडचिडेपणा, वारंवार जाणवतो. त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. त्वचेवरील चमक कमी होते. आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. अपचनाच्या तक्रारी सुरू होतात. भरपूर महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. समागमाची इच्छा कमी होते. झोप कमी येते. स्तनांचा आकार लहान होतो. वारंवार लघवी येते. हे महत्त्वाचे बदल रजोनिवृत्तीच्या काळात जाणवतात.

पुढे वाचा,
रजोनिवृत्तीच्या काळात इतर कोणत्या समस्या निर्माण होतात आणि त्यावरील काही उपाय...
मासिक पाळीचे चक्र कसे असते ?
बातम्या आणखी आहेत...