लहानपणी अनेकवेळा गवारीची भाजी न खाल्ल्यामुळे आईचा ओरडा ऐकावा लागत होता. आता जेव्हा या भाजीमधील गुणांवर होत असलेल्या आधुनिक शोधाची माहिती ऐकल्यानंतर लक्षात येते की, आईचा तो ओरडा का होता. घराघरात खाल्ल्या जाणार्या गवारीची शेती भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये केली जाते. या भाजीमध्ये भरपूर औषधी गुण सामावलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला या भाजीचे खास फायदे आणि उपाय सांगत आहोत.
गवारीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स व्हिटॅमिन K, C, A भरपूर प्रमाणात आढळून येतात. या व्यतिरिक्त यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम आढळून येते. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल किंवा वसा आढळून येत नाही. गवारीला जबरदस्त टॉनिक मानले जाते.
गवार भाजीशी संबधित आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि काही खास उपायांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर- अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) आपल्याला देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.
गवारीचे खास फायदे आणि उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)