आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात फूड पॉयझनिंगमध्ये आराम देतील हे 10 घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फूड पॉयझनिंग कोणत्याही ऋतूमध्ये खराब अन्न-पाण्यामुळे होऊ शकते, परंतु या आजाराचे सर्वात जास्त रुग्ण पावसाळ्यात दिसून येतात. यामागचे सर्वात मोठे कारण बॅक्टेरिया आणि योग्य स्वच्छता न ठेवणे हे आहे. अन्नातून विषबाधा झाली तर समजून घ्या तुमची 48 तास सुट्टी झाली. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. कारण अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते. ही समस्या वाढल्यास उपचार आणि औषध घेणे आवश्यक आहे, परंतु काही घरगुती आणि सोपे उपाय करून तुम्ही या आजारातून आराम प्राप्त करू शकता.

- अद्रक एक नैसर्गिक प्रतिजैविक पदार्थ आहे. याला अन्नातून झालेल्या विषबाधावर रामबाण उपाय म्हणून उपयोगात आणले जाते. तुम्ही अद्रक चहामध्ये टाकूनसुध्दा पिऊ शकता.

- लिंबामध्ये विविध प्रकारचे अ‍ॅसिड आढळून येतात, जे अन्न लवकर पचवण्यास मदत करतात. लिंबामुळे पोटातील बॅक्टीरिया नष्ट होतात. यामुळे फूड पॉयझनिंग झाल्यास लिंबूपाणी पिणे लाभदायक ठरते.

- डाळींबाचा रस पोटाच्या समस्यांसाठी सर्वात उपयुक्त औषध आहे. या व्यतिरिक्त डाळींबाच्या झाडाची सालही पोटाचे आजार दूर करण्यात उपयुक्त ठरते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, फूड पॉयझनिंग दूर करण्याचे घरगुती उपाय...
बातम्या आणखी आहेत...