आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदामामुळे मजबूत होतात स्नायू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदाम कित्येक आजारांवर रामबाण उपाय आहे. रोज बदाम खाण्याने तुम्ही अनेक आजार दूर ठेऊ शकता.
-पचन प्रक्रिया योग्य पद्धतीने काम करते. बदामात मोठय़ा प्रमाणात फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
-बदाम खाल्ल्याने शरीरातील साखरेचा स्तर नियंत्रणात राहतो. परिणामी, व्यक्तीच्या अतिरिक्त वजनावर नियंत्रणा ठेवता येते.
-बदामात आढळणार्‍या कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटकांमुळे स्नायू सक्षम होण्यास मदत होते.
- हृदयाचे आजार कमी करण्यासाठी बदाम अत्यंत उपयुक्त ठरतो. यामध्ये असणारे मॅग्नेशियम हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता कमी करते.