आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटाचे विकार दूर करण्‍यासाठी लाभदायक ठरतात हिंगाचे हे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्‍याही स्‍वयंपाकाला चव येत असते ती फोडणीमुळे; फोडणीसाठी अनेक स्‍वयंपाकघरातमध्‍ये मोहरी बरोबरच हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फोडणीत आधी मोहरी घातली जाते आणि मग घातला जातो हिंग. पदार्थाला उत्तम स्वाद देणारा, पचनाला उत्तम असा हिंग भारतीय स्वयंपाकात सगळीकडे आवर्जून वापरला जातो. याबरोबच हिंगचा वापर विविध आजारांवर उपयुक्त औषध म्‍हणून केला जातो. डोळ्यांचा आजार असल्यास हिंगाचे सेवन अवश्य करायला हवे. हिंग उत्तम पाचक असण्‍याबरोबच डोकेदुखी दूर करण्यासाठी हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
हिंगाचे झाड 2 ते 4 फूट लांब आणि ऊंच असते. हिंग वनस्‍पती, इराण अफगाणिस्तान, तुर्कस्तान, काबुल आणि खुरासानाच्‍या डोंगाराळ भागात मोठ्या प्रमाणात आढळते. या भागातूनच पंजाब आणि मुंबईमध्‍ये हिंगाची आयात करण्‍यात येते. महर्षी चरक यांच्यानुसार हिंग दम्याच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे. कफाचा नाश, पोटाच्या समस्या, अर्धांगवायूमध्ये हिंग लाभदायक आहे.
हिंगाचे लाभ -
- सुंठ, काळीमिर्च, पिंपळ, अजवाइन, पांढरे जीरे, काळे मिरे, शुद्ध तुपात भाजलेले हिंग आणि काळे मिठ समान प्रकाणात घेऊन बारीक वाटून घ्‍या. जेवन झाल्‍यानंतर प्रत्‍येक दिवशी 2 ते 4 ग्रॅम पाण्‍यासोबत घ्‍या. हे मिश्रण प्रत्‍येक दिवशी पाण्‍यासोबत घेतल्‍यास गॅसची समस्‍या दूर होते.
- दातांच्या आजारावर हिंग फायदेशीर आहे. दात किडले असतील तर रात्री झोपताना हिंगाचा खडा दुखणा-या दातावर ठेवून झोपावे. हिंग पाण्यात उकळून गुळणा केल्यास दातांचे दुखणे कमी होईल. शरीरात काटा घुसला असेल तर त्या ठिकाणी हिंगाची पेस्ट लावावी. या उपायाने वेदना कमी होतील तसेच काटा बाहेर पडेल.
-हिंग आणि पाण्‍याचे मिश्रणाचा नाभिजवळ लेप लावला किंवा भाजलेला हिंग मधासोबत घेतला तर पोटादूखी बंद होते.
-हिंगाचा छोटासा तुकडा पाण्‍यासोबत घेलता तर पोटात येणा-या कळा, पोटदुखी बंद होते.
हिंगाचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...