आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ मसाला नाही, या रोगांवर रामबाण औषध आहे मोठी विलायची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात अनेक वर्षांपासुन विलायचीचा उपयोग मसाला रुपात केला जातो. विलायची दोन प्रकारची असते मोठी आणि छोटी. छोटी विलायची गोड पदार्थांची चव वाढवण्याचे काम करते. तर मोठी विलायची चटपटीत पदार्थांसाठी वापरली जाते. छोट्या विलायचीला मराठीत वेलदोडा हिंदीत भूरी विलायची, लाल विलायची, नेपाळी विलायची किंवा बंगाली विलायची असे देखील म्हणतात. विलायचीच्या बीयांचा कापुरसारखा सुगंध येतो.


वेलदोड्याच्या खास गोष्टी
मोठी विलायची (वेलदोडा)चे वनस्पतिक नाव ऐमोमम कार्डामोमन आहे. आयुर्वेदामध्ये विलायची आणि वेलदोड्याचे गुण सारखेच सांगितले आहेत. विलायची वेलदोड्यापेक्षा चविष्ट असते. वेलदोड्यांचा उपयोग चटपटीत पदार्थांमध्ये केला जातो. भारतातुन मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन आणि निर्यात मोठ्या प्रमाणात होते. दक्षिण भारतातील घाट हे वेलदोड्याचे मुख्य उत्पादन केंद्र आहे. भारतातील केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडु राज्यात वेलदोड्यांची शेती केली जाते. भारतात तयार होत असलेली विलायची केवळ मसाला नसुन उत्तम औषधी आहे. या गुणांमुळेच मोठा विलायचीला मसाल्याची राणी म्हटले जाते.


1. पचनक्रिया दुरुस्त करते
मोठ्या विलायचीचे सेवन हे गॅस्ट्रो-इंटेस्टाइन सिस्टमसाठी खुप फायदेशीर आहे. याचा शरीराच्या पचनक्रियेवर चांगला परिणाम होतो. हे खाल्याने पाचकद्रव्य स्त्रावाचे संतुलन सुरळीत राहते. अ‍ॅसिडीटीच्या समस्येवर हे फायदेशीर औषध आहे. विलायची नियमित खाल्ल्याने गॅस्ट्रीक अल्सर आणि पचनक्रियेचे आजार कमी प्रमाणात होतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मोठी विलायची खाण्याचे इतर काही खास फायदे...