आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पचनशक्ती, वीर्यशक्ती तसेच स्नायुशक्ती मजबूत करण्यासाठी हा एक उपाय करून पाहा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्य जगण्याचा आंनद घेण्यासाठी मनुष्याने आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शरीर निरोगी असेल तर मनुष्य कोणतेही काम उत्साहाने आणि वेळेवर पूर्ण करू शकतो. आज आम्ही तुम्हाला एक अशा आसनाची माहिती देत आहोत, ज्यामुळे पचनशक्ती, वीर्यशक्ती तसेच स्नायुशक्ती मजबूत राहते. या आसनाला वज्रासन म्हणतात. वज्रासनाचा अर्थ आहे बलवान स्थिती.

कृती - अंथरलेल्या आसनावर दोन्ही पायांचे गुडघे वाकवून दोन्ही पायांच्या टाचांवर बसा. पायाचे दोन्ही अंगठे एकमेकांशी जुळलेले असावेत. पायाच्या तळव्यावर नितंब ठेवा. कंबर आणि हात ताठ करून गुडघ्यांवर ठेवा. तळवे जमिनीच्या दिशेने ठेवा. दृष्टी समोर स्थिर ठेवा. पाच मिनिटे ते अर्ध्या तासापर्यंत वज्रासनाचा अभ्यास करू शकता.

लाभ - वज्रासनाचा अभ्यास केल्याने शरीराचा मध्यभाग सरळ राहतो. श्वासाची गती मंद झाल्याने आयुष्य वाढते. डोळ्यांची दृष्टी वाढते. वज्रनाडी अर्थात वीर्यधारा नाडी मजबूत होते. वीर्याची ऊर्ध्वगती झाल्याने शरीर वज्रासारखे बनते. अधिक काळापर्यंत सरळपणे हे आसन केले जाऊ शकते. जेवणानंतर या आसनात बसल्याने पचनशक्ती तीव्र होते. जेवण लवकर पचते. गॅसचा त्रास दूर होतो. मलावरोध दूर होऊन पोटाचे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. शुक्रदोष, वीर्यदोष, गुडघे दुखी इ. आजार दूर होतात. स्नायू पुष्ट होतात. स्फूर्ती वाढवण्यासाठी तसेच मानसिक निराशा दूर करण्यासाठी हे आसन उपयोगी आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा आसनाचे चित्र...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)