आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WATER किती गरजेचे? जास्त पाणी पिणेही नुकसानकारक, अवश्य वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रौढ व्यक्तीने दिवसभरात किती पाणी प्यायला हवे? हा प्रश्न सोपा आहे, पण उत्तर अवघड आहे. अनेक संशोधनांमध्ये पाण्याच्या बाबतीत वेगवेगळे मत व्यक्त करण्यात आले आहे. वास्तविक हे आपले कार्य आणि आसपासच्या वातावरणावर अवलंबून असते. जास्त पाणी पिणेही नुकसानकारक ठरते.

परिस्थितीनुसार प्या पाणी :
एक गोष्ट लक्षात ठेवा की, जर तुम्ही जेवणात जास्त पाणी असणारे पदार्थ खात असाल तर कमी पाणी लागते. उदा. दूध, सरबत, कोल्ड्रिंक, रसाळ फळे, ताक, दही, चहा, कॉफी आदी घेतल्यास दिवसभरात घेत असलेले पाणी एक लिटरने कमी होईल.

किती गरजेचे आहे?
सामान्य वातावरणात व्यक्तीला दिवसभर १२-१६ ग्लास (३ ते ४ लिटर) पाणी पिणे गरजेचे आहे. वातानुकूलित वातावरणात (एअरकंडिश्नरमध्ये) जास्त काळ राहणाऱ्या व्यक्तीला २.५-३ लिटर पाणी पिणे पुरेसे असते, तर भरउन्हात काम करणाऱ्या आणि व्यायाम करण्यासाठी ५-६ लिटर पाणी घेणे गरजेचे असते.

असा ठेवा हिशेब
आपल्यासाठी जग किंवा बॉटलमध्ये पाणी वेगवेगळे ठेवा. याने पाण्याचा हिशेब ठेवणे सोपे जाईल. कामामध्ये पाणी पिणे विसरून जातो. बॉटल जवळ असेल तर पाणी प्यायचे लक्षात राहील. एकदाच सर्व पाणी पिऊ नये. थोड्या-थोड्या वेळाने एक-एक कप पाणी प्यावे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, केव्हा किती पाणी प्यावे आणि जास्त पाणी पिण्याचे तोटे...
बातम्या आणखी आहेत...