आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लहान मुलांचे जास्त वजन असणे आई-वडिलांसाठी चिंतेचा विषय असतो. फास्ट फूड अधिक खाण्यामुळे व शारीरिक हालचाली कमी केल्यामुळेही या समस्या निर्माण होतात. लहान मुलांच्या झोपण्याच्या कालावधीत थोडी वाढ केल्यास वजन कमी ठेवण्यास मदत होते हे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. जास्त वेळ झोप घेतल्यास कमी ऊर्जा खर्च होते. त्यामुळे भुकेशी संबंधित हार्मोन्समध्ये बदल होऊन वजन घटण्यास मदत होते.
एका संशोधनानुसार मुलांनी रोज चांगली झोप घेतल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ राहते व लठ्ठपणाची समस्या नसते. बाळ आयुष्याच्या सुरुवातीचे काही महिने ज्या पद्धतीने झोप घेते, त्याचा शरीराच्या वजनवाढीवर परिणाम होतो. हार्वर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी याबाबत संशोधन केले. त्यात असे सिद्ध झाले की, जी लहान मुले 11 तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांना वयाच्या तिसर्‍या वर्षापासून वजनवाढीची समस्या दुप्पट भेडसावते.

वजन कमी करण्यासाठीचे छोटे उपाय

-जेवन करताना पाणी पिऊ नये.
- जेवणात दह्याचा वापर करा याने वजन लवकर कमी होते.
- फ्रुट सलाडचा खाणे फायदेशीर आहे.