आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किती असावे तुमचे वजन, जाणून घ्या हे कंट्रोल करण्याच्या खास टिप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषांच्या कंबरेचा घेर 102 सेमी. म्हणजे 40 इंचापेक्षा जास्त आणि महिलांच्या कंबरेचा घेर 88 सेमी. म्हणजे 35 इंचापेक्षा जास्त असल्यास हे लोक टाईप2 डायबिटीज, हाय BP, हृदयविकारसारख्या गंभीर आजारांना बळी पडू शकतात. यामुळे डॉक्टर वजनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. आता प्रश्न असा पडतो की, आपले वजन योग्य आहे की नाही हे कसे माहिती करून घ्यावे. याचे उत्तर आहे BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स. 1990 च्या शेवटी BMI फॉर्म्युला आला आणि वर्तमानात हा लठ्ठपणा मोजण्याचे इंटरनॅशनल आणि सर्वमान्य फॉर्म्युला मनाला जातो. अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, दिल्लीचे चीफ सर्जन डॉ. आशिष भनौतक यांच्यानुसार बीएमआय फार्म्युलाचा वापर करून एखाद्याचे वजन सामान्य आहे की सामान्यांपेक्षा जास्त आहे हे समजू शकते. यावरूनच आयडियल वेट समजू शकते.

काय आहे मेटाबॉलिझमशी संबंध
सामान्यतः BMI जास्त असण्याचा अर्थ शरीरातील मेटाबॉलिझम रेट कमी आहे असा होतो. मेटाबॉलिझम शरीरात निरंतर चालू असणारी केमिकल प्रोसेस आहे. ज्यामुळे अन्न डायजेस्ट होऊन एनर्जी आणि फॅटमध्ये बदलते. यामुळे शरीराला नवीन पेशी बनवण्यास आणि काम करण्यास ऊर्जा मिळते. मेटाबॉलिझम कमी झाल्यास शरीर अन्नातून मिळालेल्या पर्याप्त कॅलरी खर्च करू शकत नाही. याच एक्स्ट्रॉ कॅलरी फॅट बनून शरीरात जमा होऊ लागतात आणि यामुळे वजन वाढते. डॉ आशिष सांगत आहेत, कशाप्रकारे तुम्ही तुमचा BMI काढू शकता आणि शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढवण्याचे खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...