चायना प्रॉडक्ट संदर्भात नेहमी एक म्हण वापरली जाते ' चली तो चॉंद तक, नहितो शाम तक'. आज बाजारात विविध प्रकारच्या इलेक्ट्रानिक्सच्या वस्तुपासून श्रीगणेशाची मुर्ती, पतंगासारख्या विविध वस्तू भारतीय बाजरपेठेत उपलब्ध आहेत. या वस्तु किती दिवस हाताळता येतील याची शाश्वती नाही. भारतीय बाजापेठेत 'चीन' च्या विविध वस्तू विक्रिसाठी पाहायला मिळतात. मात्र आपले आरोग्य सुरक्षीत ठेवण्यासाठी आणि आजारापासून दूर राहण्यासाठी 'चीन' या देशामध्ये वापरण्यात येणारा एक्यूपंचर आणि एक्युप्रेशर हा विविध आजारावर सोपा आणि चांगला उपाय मानला जातो.
या उपचार पध्दतीसाठी वेळ लागत असला तरी यापासून साइड इफेक्टची भिती नाही. आपल्या देशात या उपचार पद्धतीला पाहिजे तेवढा प्रतिसाद आज मिळत नसला तरी 'चीन' देशात मात्र मोठ्या प्रमाणात या उपचार पध्दतीचा आवलंब केला जातो. आलीकडे मात्र आपल्या देशात आजाराव उपचार करण्यासाठी 'चीन' ची एक्यूपंचर ही पध्दत मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.
एक्युप्रेशर आणि एक्युपंचर यामध्ये येणार एक्यु हा शब्द चीनी भाषेतील आहे. एक्यु या शब्दाचा आर्थ आहे पॉइंट. शरीराच्या काही महत्वाच्या पॉइंटरवर सुईने टोचून केलेल्या उपचार पध्दतीला एक्युपंचर म्हटले जाते. या पॉइंटवर हाताने किंवा एखाद्या वस्तुने दाबून केलेल्या उपचार पद्धतीला एक्युप्रेशर पद्धती म्हणून ओळखले जाते. हात आणि पायाच्या पॉइंटला दाबून केलेल्या पध्दतीला रिफ्लेक्सॉलजी म्हणतात. मसाजच्या माध्यमातून शरीराचे पॉइंट दाबण्याच्या पद्धतीला 'शियात्सु' म्हणून ओळखले जाते. या पद्धतीचा योग्य वापर केला तर आजारावर होणारा खर्च कमी करता येईल. याबरोबरच निरोगी आरोग्य लाभेल.