आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध आजारापासून दूर राहण्‍यासाठी आहारात करा दह्याचा वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्‍याही चांगल्‍या कार्याला सुरूवात करण्‍याआगोदर दही खाल्ले पाहिजे अशी धारणा आहे. याबरोबरच दही हा पदार्थ आरोग्‍यासाठी पौष्‍टीक आणि चांगला मानला जातो. दह्यामध्‍ये असे काही रासायनिक घटक आहेत ज्‍यामुळे दुधापेक्षा दही लवकर पचते. ज्‍या लोकांना पोटाचा विकार असेल अशांनी आहारात दह्याचा वापर केल्‍यानंतर अपचन, कफ, गॅस यासारखे आजार लवकर बरे होतील. पचन योग्‍य प्रकारे आणि सूरळीत होते. भुक लागत नसेल तर आहारात दह्याचा जास्‍तीत- जास्‍त वापर करा. यामुळे खाल्लेले अन्न पचते आणि वेळेवर भुक लागते. आहारात दह्याचा वापर हजारो वर्षांपासून करण्‍यात येत आहे. दह्यात प्रोटीन्‍स, कॅल्शियम, रायबोफ्लेवीन, व्हिटामीन बी, ही पोषकतत्वे आढळतात. दात आणि हाडे मजबूत राहण्‍यासाठी दुधापेक्षा दह्यामध्‍ये 18 टक्‍क्‍यापेक्षा जास्‍त कॅल्शियम असते. दह्यामुळे दात व हाडे मजबुत राहतात.
पचन शक्‍ती वाढते-
उन्‍हाळ्यात आहारात धयाचा वापर केला तर उष्‍णतेचा वाईट परिणाम शरीरावर होणार नाही. शरीरातील अशक्‍तपणा दह्यामुळे कमी होतो. दुधाचे दह्यामध्‍ये रूपांतर झाल्‍यानंतर दह्यातील अम्‍ल पचनक्रिया सुरळीत करते.
पुढील स्‍लाईडवर वाचा काय आहेत दह्याचे फायदे...