आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंबरदुखीचा त्रास असेल तर करा हा साधा-सोपा उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल कंबरदुखी हा आजार लहान मुलापासून ते प्रोढापर्यंत सर्वांना छळतो आहे. काही दिवस औषधे घेतल्यानंतर आणि मलम लावल्यानंतर कंबरदुखी बरी होईल अशी प्रत्‍येक रुग्णांची इच्छा असते. ब-याचदा औषधे घेतल्‍यानंतरही कंबरदुखी बरी होत नही. कंबरदुखी पासून कायमची सुटका करून घेण्‍यासाठी औषधांबरोबर कंबरेचे व्यायाम करणे आवश्यक आहे. खूप कंबर दुखत असेल तर व्यायाम करू नये. चांगल्‍या अस्थिरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतलेला योग्‍य राहिल.
सांधे आखडल्‍याने किंवा काम करताना बसण्‍याच्‍या चूकीच्‍या पद्धतीमुळे कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. जास्‍त वजन असलेल्‍या व्‍यक्‍तीला कंबरेचा त्रास सुरू होतो. हाडामध्‍ये कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्‍यानंतरही कंबरेचा त्रास सुरू होतो. जर तुम्‍हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर प्रत्‍येक दिवशी ' मकरासन' प्रयोग केल्‍या नंतर कंबरदुखीपासून आराम मिळेल.
कसे कराल 'मकरासन'
पोटावर झापो. दोन्ही पाय जोडून घ्‍या. मान आणि खांदे उचलून दोन्‍ही हाताने खांद्याला आधार द्या. मानेला त्रास होत असेल तर मानेला काही वेळ आराम द्या. यामुळे व्‍यायाम करताना त्रास होणार नाही. हे असान करत असताना कंबर त्रास देत असेल तर मान सळर जमीनीलगत येऊ द्या.
काय काळजी घ्‍याल
हे आसन करत असताना घुडघ्‍यापासून पाय दुमडू नका. 10 ते 30 सेंकद या आवस्‍थेत राहा. तुमच्‍या शरीराला जखम असेल तर हा योग करण्‍याआगोदर अस्थिरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्‍या.
मकरासनचे फायदे-
कंबरदुखीच्‍या त्रासाबरोबर सांधे दुखी यासारख्‍या आजारापासून लांब राहण्‍यासाठी मकरासन लाभदायक ठरते.