आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताकदवान राहण्यासाठी पुरूषांनी खावेत हे पदार्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धावपळीच्या जीवनशैलीत आपल्याला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही. दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर कौटुंबीक जबाबदारीमध्ये अनेक पुरूष आरोग्याकडे दूर्लक्ष करतात.
यामुळेच पुरूषांमध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. तणाव आणि कामाचा ताण यामुळे वयाच्या तिशीनंतर पुरूषांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आज आम्ही सांगत असलेल्या पदार्थांचा पुरूषांनी त्यांच्या डाएटमध्ये समावेश केला तर कमजोरी दूर होते आणि शरीर ताकदवान होते.
मोड आलेली कडधान्ये- मोड आलेले कडधान्ये पुरूषांच्या आरोग्याविषयी चांगले आहेत. यात मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. याबरोबरच यात झिंक आणि इतर पोषक घटक असतात जे पुरूषांमधील कमजोरी आणि नपुंसकता कमी करण्यासाठी उपयुक्त असतात.
शेंगदाणे- दाण्यामध्ये झिंकसोबतच मुबलक प्रमाणात स्निग्ध आम्ल असतात. स्निग्ध आम्ल पुरूषांसाठी उपयोगी असते. याच्या सेवनाने पुरूषांमधील कमजोरीची समस्या नाहिसी होते.