आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालता-फिरता हे उपाय केल्याने तुमची त्वचा होईल चमकदार, फेशिअलची 'नो झंझट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चमकणारा चेहरा कुणाला आवडत नाही. परंतु जगातील अनेक लोक फक्त विचार करतात, की आपला चेहरा कसा चमकू शकतो. तसे तर परफेक्ट त्वचा करणे सोपे काम नाहीये. त्यासाठी योग्य खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यावे लागते. तसेच त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या त्वचेकडे बारकाईने लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे त्वचा सुकते. तुम्हालाही अशीच समस्या असेल, तर आम्ही आज तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा चेहरा चमकू लागेल आणि सुंदर दिसू लागले.
- दोन छोटे चमचे बेसनपीठात दोन चमचे हळद मिसळा. या मिश्रणात दहा थेंब गुलाब जल आणि दहा थेंब लिंबाचा रस मिसळून त्याला चांगले हलवा. त्यानंतर कच्च्या दुधात मिसळून त्याचे थोडे पातळ लेप बनवा. हा लेप आंघोळीपूर्वी चेह-यावर लावा आर्धा तासाने चेहरा पाण्याने धुवा. तुमचा चेहरा तजेलेदार दिसायला लागेल.
- रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास गाजराचा ज्यूस पिल्याने त्वचेचा रंग उजळतो.
- एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाच्या रसाचे मिश्रण चेह-यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.
- मुल्तानी मातीमध्ये गुलाब जल मिसळून लावल्यानेसुध्दा त्वचा चमकू लागते.