आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत डोकेदुखी कमी करण्याचे घरगुती रामबाण उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोकेदूखी एक सामान्य आजार आहे. अपचन, वायू, उष्माघात, अनियमित मासिक पाळी, सायनस, जंतू, ताप, रजोनिवृत्ती, विनाकारण टेंशन घेणे, रात्रीचे जागरण, अनिद्रा, उन्हात फिरणे, कंटाळा, अशक्तपणा, मद्य, तंबाखू सारख्या पदार्थांचे सेवन करणे अशा अनेक कारणांमुळे डोकेदूखी होऊ शकते. जास्त प्रमाणात पेन किलर खाण्याने रिअ‍ॅक्शनची भिती असतेच. तुम्हाला डोकेदूखीचा त्रास असल्यास हे उपाय जरूर करून पाहा.

- लवंगमध्ये मिठ मिसळून याची पावडर बनवा. ही पावडर भरणीत भरून ठेवा आणि डोकेदूखी असेल तेव्हा कच्च्या दूधात याची पेस्ट करून डोक्यावर लेप लावावा. याने काही वेळातच डोकेदूखी कमी होते.
- एक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस टाकून प्यायल्याने वायूमुळे होणारी डोकेदूखी कमी होते.

- सततच्या डोकेदूखीचा त्रास असल्यास रोज एक ग्लास गायीचे दूध प्यावे.
- दालचिनीची पावडर पाण्यात मिसळून याची पेस्ट तयार करुन डोकेदूखत असताना डोक्यावर लेप लावल्याने आराम मिळतो.