आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरणशक्ती वाढवण्याचा \'भद्रासन\' हा रामबाण उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्‍हाला जर आयुष्‍यभर तुमची बुध्‍दी चांगली ठेवायची असेल तर त्‍यासाठी योग्‍य ती काळजी घ्‍यायला हवी. धावपळीच्‍या जिवनात आरोग्‍याची काळजी घेतली तरी बुध्‍दीचा चंचलपणा वाढू शकतो. स्‍मरणशक्‍ती वाढवण्‍यासाठी विशेष मेहनत घेतली तरच बुध्‍दीचा विकास होतो.
भद्रासन -
भद्रासन करण्‍यासाठी जमिनीवर चटई टाका. गुडघ्‍याच्‍या साहाय्याने उभे राहा. डावा पाय गुडघ्‍यात वाकून खाली बसा. या प्रकारे डावा पाय गुडघ्‍यात वाकवून मागे न्‍या. दोन्‍ही गुडघे संमातर जमिनीवर ठेवा. आता तुमच्‍या शरिराचा सर्व भार तळपायावर पडेल. यानंतर डाव्‍या पायच्‍या अंगठ्याला उजव्‍या हाताने पकडा. या प्रकारे आसन केल्‍यानंतर श्वास मंदगतीने आत घ्‍या. यानंतर गुडघ्‍याच्‍या दिशेने डोके थोडे झुकवा. या स्थितीमध्‍ये जितकावेळ राहता येईल तेवढे राहा. नंतर डोके वरती करून श्वास बाहेर सोडा. आशा प्रकारे भद्रासन केल्‍यानंतर बुध्‍दीचा विकास होतो.
भद्रासनचे लाभ-
या असनामुळे शरीर निरोगी आणि मजबुत राहते. स्‍मरणशक्‍ती वाढते. कल्‍पनाशक्‍ती वाढते. पचनशक्‍ती वाढते. डोकेदुखी, दमा, उचकी, पोटाचे आजार बरे होतात.