आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

pics : अशा पद्धतीने पालक खाल्ल्यास दूर होईल मुतखडा, उच्चरक्तदाबाचा त्रास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्तातील हिमोग्लोबीन वाढीसाठी पालक अत्यंत गुणकारी भाजी आहे. पालकाचे वनस्पतिक नाव स्पीनेसिया ओलेरेसिया आहे. 100 ग्रॅम पालकमध्ये 26 किलो कॅलरीज आढळतात. 2.0% प्रोटीन, 2.9% कार्बोहायड्रेट, 92% पाणी, 0.7% चरबी, 0 .6% फायबर, 0.7% खनिज आढळतात. पालकमध्ये कॅल्शियम आणि लोहसारखी खनिजे आढळतात. यासोबतच ए,बी,सी यासारखी व्हिटॅमीन मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच पालकला लाईफ प्रोटेकटीव्ह फूड असेही म्हटले जाते.
कच्चा पालक फार गुणकारी असते. याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुरळीत काम करते. खोकला आणि फुफ्फुसावर आलेली सूज कमी करण्यासाठी पालकच्या रसाने गुळण्या कराव्यात. पालकच्या रसाने दृष्टीदोष कमी होतो. तसेच स्मरणशक्तीही वाढते. पालकमध्ये आयोडीन असल्याने थकवा दूर होतो.
पालकच्या रहस्यमय गुणांची माहिती आज आपल्याला सांगत आहेत डॉ. दिपक आचार्य (डायरेक्टर- अभ्रुमका हर्बल प्रा.लि.अहमदाबाद) डॉ.आचार्य 15 वर्षापासून मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान राज्यातील आदिवासी भागाचा दौरा करत आहेत. आदिवासींची जीवनपद्धतीचा अभ्यास करत आहेत.